जैन समाजाच्या धार्मिक, सामाजक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या जैन विकास महामंडळातर्फे 511 लाभार्थ्यांना केलेले 51 कोटी रूपयांचे कर्ज मंजूरी व वितरण व ही जैन समाजातील उपेक्षित व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी विकासाच्या नवीन अध्यायाची सुरूवात ठरेल असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांनी केले.
घाटकोपर मुंबई येथील पोलीस हॉकी ग्राऊंड च्या मैदानात विशेष उभारलेल्या प्रासादतुल्य भव्य सभामंडपात ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री नाम. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री नाम. मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत क्वचित दिसणारा रोजहर्षक नजारा म्हणजे जैन धर्मातील श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी, तेरापंथी या सर्व संप्रदायाचे धर्मगुरू राष्ट्रसंत नम्रमुनि, यशोकल्याण विजयजी, मुक्तिनिलय विजयजी, लक्ष्मीसन भट्टारकश्री, महासती गणिनी आर्यिका रत्न 105 सृष्टिभूषण माताजी, आर्यिका 105 विश्वयश्मती माताजी यांच्यासह अनेक धर्मगुरू या समारंभाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर उपस्थित होते. जैन समाजाच्या व्यापक एकतेच्या दृष्टीने हे दृश्य अत्यंत सुखदायी असल्याची भावना सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंत नम्रमुनि यांनी आजचा समारंभ हा जैन समाजाच्या इतिहासातील सुवर्णदिन असुन समाजाच्या गरजवंतांसाठी प्रगतीचे नवीन द्वार खुले होणार असल्याचे सांगितले.
मंगलप्रभात लोढा यांनी ललित गांधी यांच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ साकार झाले ही बाब कौतुकास्पद असुन समाजाच्या विकासासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष नाम. ललित गांधी यांनी महामंडळ स्थापनेमागची पार्श्वभुमि विशद केली व अनेक वर्षांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा समाजविकासाबरोबर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असुन महामंडळातर्फे जैन धर्माचे प्राकृत संस्कृत मधील दुर्मिळ साहित्य मराठीत रूपांतर करण्याबरोबरच मराठी जैन साहीत्याचा विश्वकोश बनविण्यात येईल अशी घोषणा केली.
सांस्कृतिक मंत्री नाम. आशिष शेलार यांनी विश्वकोशासाठी माहीती तंत्रज्ञान मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय महामंडळासमवेत संयुक्तपणे कार्य करेल असे सांगुन महामंडळाच्या कर्ज वितरणाचे चेक देऊन शुभारंभाची संधी ही राष्ट्र विकासातील योगदानाची महत्वाची घटना ठरेल असे सांगितले.
समारंभाला महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, दिगंबर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमनालाल हपावत, नयन भेदा, हार्दिक मामनीया, जीतो-मुंबई विभाग महिला अध्यक्षा राखी सोनिग्रा, अमृत गडा, भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष ख्यालीलाल तातेड, अवस सचिव आनंदा शेंडगे, एम.डी. राजकुमार अलकुंटे यांच्यासह समाज अग्रणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाम. मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शहा, राष्ट्रसंत नम्रमुनी, लक्ष्मीसेन भट्टारक, ललित गांधी, रावसाहेब पाटील यांच्या हस्ते डिजीटल पध्दतीने महासती चंदनबाला महिला गृहउद्योग योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्चशिक्षण कर्ज व्याजपरतावा योजना, शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याजपरतावा योजना, प्रधानमंत्री आवास कर्ज व्याज परतावा योजना, भागिदारी व्यवसाय कर्ज व्याजपरतावा योजना, महिला बचत गट कर्ज व्याज परतावा योजना पाच योजनांची उद्घाटन करण्यात आले.
राज्याच्या विविध 28 जिल्ह्यातुन योजनांचे लाभार्थी, विविध समाजप्रमुख व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी सुत्रसंचालन केले तर रावसाहेब पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.